विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे. विश्रांतीच्या काळात बागेची काय काळजी घेतली पाहिजे या विषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली...लिखाण करून संपवावा असा हा विषय नाही..पण खाली काही फवारणी व आणखी काही नियोजन सांगितले आहे...ते नीट अवलंबले तर निश्चितच चांगली फळधारणा होण्यास काहीही अडचण येणार नाही...!! *आधीच्या बहार मध्ये फळ निघून गेल्याने झाडांतील जवळपास सर्वच ताकत निघून गेलेली असते,परिणामी झाडाच्या काडीतील अन्नद्रव्ये स्टोरेज पूर्णतः संपलेले असते..अशा वेळी फळ निघून बाग ताणावर सोडायच्या आधी झाडाला NPK खतांची योग्य अशी मात्रा द्यावी..जेणेकरून झाडात परत ताकत निर्माण होईल..काही शेतकरी एकदा बागेतील फळ निघून गेले कि परत पुढची पानगळ करायच्या वेळीस बागेत येतात...मित्रहो असे ढिसाळ नियोजन चालत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर बाळंतीण बाई 9 महिने बाळ आपल्या पोटात वाढविते..त्याच्या पोषणावर तिची सर्व ताकत खर्च होते..व डिलिव्हरी झाली कि आपण तिला खारीक खोबरे..इतर पोषणहार खाऊ घालतो जेणेकरून तिची कमी झालेली ताकत पुन्हा भरून येईल...मित्रहो इथे डाळिंबाचे ...















सुर्वे साहेब
उत्तर द्याहटवाखूप महत्त्व पूर्ण माहिती आहे ,सर मी ह्या पोस्ट चे सगळे screen shot काडून घेऊन save केले ,
अत्यन्त माहीती पूर्ण पोस्ट