पावसाळी वातावरणात फळांवर डाग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी - श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
पावसाळी वातावरणात फळांवर डाग येऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी - श्री सुशांत हिरालाल सुर्वे. पावसाळी वातावरणात साधरणतः बागेची काय काळजी घ्यावी याची आज सविस्तर माहिती घेऊ...! पावसाळी वातावरणात स्प्रे घेताना पाऊस पडल्यावर लगेचच दुसऱ्या दिवशी फवारणी घ्यावी कि नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो..तर पावसाळी वातावरणात तुमचे नेहमीचे आठवड्याला स्प्रे घेता त्याच पद्धतीत स्प्रे घेणे गरजेचे असते..पाऊस झाला म्हणजे लगेचच स्प्रे असं नाही..तर पाऊस पडून कडक ऊन जर पडले तर लगेचच फवारणी घ्यावी..!!सारखा संततधार पाऊस चालला तर स्प्रे ऐवजी कॉपर डस्टिंग/सल्फर डस्टिंग धुरळणी केली तरी चालेल Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. पावसाळी वातावरणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी खालील गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. 1)पुरेसा प्रकाश - पावसाळ्यात बऱ्याच वेळा सूर्यप्रकाशाचा अभाव असतो, ढगाळ वातावरण..सूर्यप्रकाशाचा अभाव इत्यादीने बागेतील आद्रता वाढत जाते. शिवाय झाडांचा अन्न तयार करण्याचे काम काही अंशी कमी होते. बुरशीजन्य रोगांच्या वाढीसाठी हे वातावरण पोषक असते. त्यामुळे, *Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. पावसाळी...