कोरोना व ऑनलाईन फसवणूक : भाग 1 व भाग 2
ऑनलाईन फसवणूक समंधित खालील दिलेले दोन्ही भाग नीट
वाचा व जास्तीत जास्त शेअर करावेत.
कोरोना आणि ऑनलाईन फसवणूक-भाग १
मित्रांनो नमस्कार. शेती विषय सोडून आज थोडा वेगळा विषय आहे पण संकटाच्या या कालावधीत याविषयी जागरूकता होणे आवश्यक आहे म्हणून लिहणे गरजेचे वाटत आहे.
कोरोना कालावधीत अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही ठिकाणी उद्योगधंदे ठप्प आहेत, काही लोकांना दोन वेळच्या जेवणाची तर काहींना भविष्यात काय लिहून ठेवले आहे याची भ्रांत आहे.
या सर्व अडीअडचणींना तोंड देत, कोरोनारूपी राक्षस पावलोपावली पाठलाग करत असताना देखील आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.
या कालावधीत पैशांची बचत करून आपण आपले जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण याच कालावधीत संधीचा फायदा घेऊन आपणाला लुबाडणारे देखील
वाढत आहेत..!
आता मुख्य विषयाकडे जाऊयात.
मित्रांनो कोरोना कालावधी नंतर इंटरनेट चा वापर झपाट्याने वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात इंटरनेट प्रभावीपणे वापरले जात आहे. कोरोना कालावधीत डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे प्रामण देखील चांगले वाढत आहे व त्याच बरोबर त्यात फसवणूक होण्याचे प्रमाण देखील वाढत आहे.
मी डाळिंब क्षेत्र मध्ये काम करत असताना मला काल एका व्यक्तीचा फोन आला. सदरील सर्व बोलणे हिंदीतून झाले पण मराठीत मी ते आपल्यासाठी टाकत आहे.
मी विकास पटेल बोलत आहे, आर्मी कॅम्प मध्य प्रदेश मधून. मला डाळिंब पाहिजे आहेत ५ टन. मी त्यावर सांगितले आपण कोणत्या मार्केट मधून बोलत आहे ..? दुकान च नाव काय ..? व्हिझिटिंग कार्ड आहे का ..? यावर ती व्यक्ती बोलली मला आर्मी कॅम्प साठी पाहिजे डाळिंब...म्हंटल आम्ही मार्केट सोडून बाकी कुणाला नाही देत डाळिंब...! आणि आता एवढे 5 टन नाही, सध्या १००-२०० किलो च्या वर डाळिंब देता येणार नाही ..!
त्यावर समोरील व्यक्ती बोलला कि २०० किलो द्या, मी तुम्हांला लगेच २०० किलो चे २००००/- पेमेंट टाकतो. म्हंटल आम्ही मार्केट सोडून डाळिंब देत नाही, मार्केट चा पत्ता द्या आणि डाळिंब घ्या. त्यावर त्या व्यक्तीने फोन कट केला.
आता इथे मी २००००/- कडे जर पहिले असते तर त्यांनी मला एक कोड सेंड केला असता तो स्कॅन करायला सांगितला असता...मग मी तो स्कॅन केला असता तर माझे बँक अकाउंट रिकामे झाले असते.
या ग्रुप मध्ये हि माहिती देण्याचे कारण असे कि मी डाळिंब क्षेत्रात काम करतो म्हणून त्यांनी मला या बाबतीत मेसेज केला. उद्या आपण कोणत्या भाजीपाला फळे खरेदी विक्री किंवा अन्य काही आमिष दाखवून हि लोक आर्मी च्या नावाखाली फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात.
आपला विश्वास बसावा म्हणून हे त्यांचे डुप्लिकेट आर्मीचे कार्ड, डुप्लिकेट ड्रेस वरील मेडल घालून काढलेले फोटो, डुप्लिकेट ऑफिस सर्व माहिती सेंड करतात. व आपला विश्वास बसला कि आपले अकाउंट रिकामे व्हायला वेळ लागत नाही .
मोबाईलच्या नावाखाली २१०००/- ची फसवणूक, स्वस्त आर्मी बुलेट च्या ९००००/- ची फसवणूक, आईस्क्रीम ची ऑर्डर नावाखाली २५०००/- ची फसवणूक, फोनेपे कॅशबॅक नावाखाली ५०००/- ची फसवणूक हे सर्व उदाहरणे माझ्या पाहण्यात होती त्यामुळे मी त्यांना काही प्रतिक्रिया दिली नाही.
पण शहरी भागातून आता हे लोक स्वस्त बुलेट/ भाजीपाला / कॅशबॅक/ शेतमाल मशिनरी इत्यादींच्या माध्यमातून आमिष दाखवून ग्रामीण भागाकडे देखील आपला मोर्चा वळवत आहेत त्यामुळे आपण वेळीच सावध होण्याची गरज आहे.
माझे सर्व शेतकरी बांधवांना सांगणे आहे कि शहरातील काही रोज इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना, नोकरदार व्यक्तींना फसवण्यात देखील हे लोक माहीर आहेत, आपण तर यात आता नवीन आहोत त्यामुळे विशेष काळजी घ्या.
त्यासाठी,
- स्वस्त बुलेट/कॅशबॅक/शेतमाल ऑनलाईन विक्री इत्यादी गोष्टींपासून लांब रहावे.
- आपले ATM एक्सपाइयर झाले आहेत, मी बँक मधून बोलत आहे आपल्या नम्बरवर आलेला OTP सांगा असे फोन लगेच ब्लॉक करा.
- कॅशबॅक वैगरे गोष्टींच्या नादि लागू नका.
- ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या. मोठा व्यवहार शक्यतो बँक मधून करावा.
या गोष्टी गरजेच्या आहेत कारण यात फसवणूक झाल्यावर परत ती रक्कम मिळणे फार अवघड असते. कारण यात एका नंबरवरून कॉल येतो, दुसऱ्या नंबरवर पैसे मागितले जातात आणि तिसऱ्या अकाउंट वर जमा होतात व आपल्यापासून हजारो किलोमीटर वरून हे सर्व रॅकेट चालले जाते...म्हणून यात कुणाला अटक होऊन आपले पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
मित्रांनो, कोरोना कालावधीत आपण डिजिटल गोष्टींचा वापर वाढवला हि चांगली गोष्ट आहे, पण या कालावधीत एक रुपया देखील महत्वाचा आहे...!आपल्याला असे हजारो रुपयांचे नुकसान परवडणारे नाही..!! त्यामुळे आपण सावध व्हा व इतरांना देखील वेळीच सावध करा..!!
कोणत्याही आमिषाला/ स्वस्त गोष्टींना बळी पडू नका हि विनंती...!!
धन्यवाद.
श्री. सुशांत हिरालाल सुर्वे.
संगमनेर, अहमदनगर.
फोन: ७७-२००९-२०११
कोरोना आणि ऑनलाईन फसवणूक- भाग २
बाबांनो आतातरी सावध व्हा रे...
मागे आपल्या ग्रुपवर मोठी पोस्ट टाकली होती कि ऑनलाईन फसवणूक वाढत आहे, मिलिटरी चे आयडी आधारकार्ड मेडल घालून काढलेले डुप्लिकेट फोटो दाखवून फसवणूक होतेय... कशा पद्धतीने फसविले जाते याचे उदाहरण देऊन मोठा लेख लिहला होता, अनेक आभाराचे व अनेक फसले गेलेल्यांचे देखील कॉल आले इतके करूनही लेख टाकून या फसवणुकींबद्दल जागृती करूनही त्यानंतर देखील अनेक लोकांनी ऑनलाईन फसवणुक झाल्याच्या व आता काय करावे अशा पोस्ट केल्या..!!
आज सकाळी पेट्रोल पंप वर एक शेतकरी मित्र भेटले, ज्यांचा ट्रॅक्टर मशागतीचा व्यवसाय देखील आहे.
बोलताना विषय निघाला क्लासिक बुलेट येतेय म्हणे आपली उद्या परवा...कितीला घेतली म्हंटल्यावर म्हणे ५००००/- ला झाला आहे व्यवहार.. मिलिटरीमॅन ची गाडी आहे म्हणे..! एवढं ऐकलं आणि मी डोक्याला हात लावला..!
काही पैसे दिले का म्हंटल त्यांना .. तर बोलले कि १०००/- रुपये ऍडव्हान्स दिला आहे.. आणि २५००/- रुपये ट्रान्सपोर्ट खर्च दिलाय....म्हंटल १०० च्या स्टॅम्प वर मी लिहून देतो कि तुमची गाडी येणार नाही, आता ३५००/- गेले ते जाऊद्या पण परत तुम्हांला फोन येईल कि काही रेजिस्ट्रेशन वैगरे साठी ५०००/- रुपये अजून लागत आहे तर पैसे पाठवू नका..अशा फसवणुकी वाढत आहे.
तर समोरील व्यक्ती म्हणे नाही नाही त्यात कसली फसवणूक.? मिलिटरीमॅन आहे तो त्यांनी या त्याचे फोटो आयडीकार्ड पाठवले आहे आणि गेला ४-६ हजार खर्च गेला तर जाऊद्या एवढ्या स्वस्तात क्लासिक बुलेट कुठे भेटायचीय .
मित्रांनो आता इथे त्यांच्याकडे फेसबुक वैगरे या गोष्टी नसल्याने त्यांनि मी मागे या संदर्भात लिहलेला लेख त्यांनी वाचलेला नसेलच किंवा ज्यांची अशा रीतीने फसवणूक झाली असेल तर त्यांचे अनुभव पण वाचले नसतील किंवा हे सर्व वाचूनही ५००००/- त बुलेट हि गोष्ट महत्वाची कि माझं बोलणे हा हि प्रश्न होता.. मी त्यांना समजविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आता जे काही नुकसान होणार होते हि त्यांची जबाबदारी होती..!!
असेच अनेक ठिकाणी होत आहे, खालील कारणे व आपला त्याबद्दलचा मोह आपल्याला १००% नुकसानीत घेऊन जातो.
१) फोनपे / गुगलपे कॅशबॅक
२) स्वस्त बुलेट
३) olx वर बघितलेली स्वस्त चारचाकी
४) लोन मंजूर करून देणे ऑफर
५) १० रुपये चा जिंकलेला रिचार्ज
६) स्वस्त मोबाईल
७) लॉटरी
८) पेटियम कागदपत्रे एक्सपायर झालेत
९) ATM ची व्हॅलिडिटी संपली आहे
१०) तुमच्या व्यवसायाच्या प्रोडक्ट ची मोठी ऑर्डर
११) तुमच्या जागेमध्ये मोबाईल टॉवर लावण्याची ऑफर
१२) कोरोना मध्ये आपल्या बँक मार्फत 2-5 लाखाचे लोन मिळत आहे, लोन अर्धा तासात मंजूर होईल, त्यासाठी तुमचे आधारकार्ड व पासबुक फोटो सेंड करा, व टक्केवारी म्हणून लोन च्या 10% रक्कम आधी मागितली जाते.
वरील कारणे सांगून फसवणूक होण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे, वेळीच आपण याविषयी जागरूक होण्याची गरज आहे.
असे अनेकविध कारणे देऊन आपल्याला जाळ्यात ओढले जाते व आपले आर्थिक नुकसान होते.
यात कॉल करणारे हे हिन्दीतुन बोलतात, मिलिटरी ची आयडी फोटो मेडल आधार कार्ड आपल्याला व्हाट्सअँप करतात व आपण मग मिलिटरीप्रति असलेला आदर, त्यांनी मारलेला डायलॉग “हम पर विश्वास नही क्या ..? मिलिटरी पर विश्वास नही क्या ..? “ यावर आपण विश्वास ठेवतो व फसले जातो.
मित्रांनो, मी मागे सांगितले होते पैसे इतके सहज जात नाहीत “वरील आमिषे/कारणे दाखवून आपल्याला OTP पाठवला जातो किंवा कोड स्कॅन करण्यास सांगितले जाते“ हे जर नाही केले तर पैसे जाणार नाहीत पण अनेक लोक आलेला otp त्यांना सांगतात किंवा मग कोड स्कॅन करतात. यात हिंदीतून फोन एका नंबरवर येतो, दुसऱ्या नंबरवर पैसे मागितले जातात व आपल्या पासून हजारो किलोमीटर वर बसून हे सर्व चालत, त्यामुळे एकदा तुम्ही पैसे पाठवले कि त्या रकमेला गोल राउंड मारून टाकायचे.
वरील उदाहरण मी याकरिता सांगितले आहे, मित्रांनो हजारो किलोमीटर वर बसून हे लोक लाखो रुपयांचा फ्रॉड करतात, आई वडील मुलगा यांचा हा फॅमिली बिझनेस आहे व यातून दिवसाला ते हजारो रुपये कमवितात.
आता हे लोक खेड्यातील लोकांना देखील फोन करत आहे. मी त्यासाठी फेसबुक वर जागरूकता म्हणून मोठा लेखही टाकला होता पण ज्यांनी वाचले ते सावध झाले पण ज्यांनी नाही वाचला त्यांची फसवणूक होऊ शकते.
गावखेड्यातील प्रत्येक तरुण मित्रांना विनंति आहे, आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून अशी माहिति आपल्या गावांतील ग्रुपवर टाकावी, जे ह्या गोष्टी वापरत नसतील किंवा गावकट्टयावर कुणाची मिलिटरी मॅन कडून वैगरे गाडी घेण्याची चर्चा चालू असेल तर नीट चौकशी करावी, त्यांना वेळीच थांबवा तरच तुमचा सोशल मीडिया वापरणाऱ्यला अर्थ आहे.
मित्रांनो परत एकदा सांगितलेल्या गोष्टी वाचा... मोह टाळा..गावखेड्यात हे फसवणुकीचे लोन पसरु नये म्हणून सतर्क व सावधान रहा व इतरांनाही वेळीच सावध करा.!!
धन्यवाद.
श्री. सुशांत हिरालाल सुर्वे
डाळिंब सल्लागार
संगमनेर अहमदनगर
संपर्क : ७७-२००९-२०११
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा