डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)
डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011 ) डाळिंबावरील तेल्या रोगावर अजूनही १००% कंट्रोल देणारे एकही औषध बाजारपेठेत उपलब्ध नाही...जर कोणी तुम्हाला महागड्या किमतीत अशी औषधे देत असतील तर ते निव्वळ आपल्या या रोगाबद्दलचा अज्ञानीपणाचा फायदा घेऊन आपला खिसा भरत आहे असे समजावे...अशा लोकांकडून १०० रुपयांचे स्टॅम्पवर लिहून घ्यावे कि तुमची औषधे वापरल्यावर आमच्या तेल्यायुक्त बागेत जुलै-ऑक्टोबर या काळात तेल्याचे एकही फळ आढळणार नाही. नंतरच मग अशी औषधे वापरण्यास सुरुवात करावी. मुखत्वे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव हा जुलै ते सप्टेंबर या कालावधीत होतो. बागेतील आद्रता, अतिरिक्त सिंचन,अस्वच्छता, झाडांची अति गर्दी व योग्य प्रकारच्या फवारणीचा अभाव इत्यादी कारणांमुळे तेल्या रोगाचा प्रादुर्भाव बागेत वाढत जातो. माझ्या आतापर्यंतचा अनुभवात असे लक्षात आले कि, तेल्या रोगासाठी लोक अतिरिक्त फवारणी करत जातात. एकामागून एक अँटिबायोटिक, विविध ऍसिड, तेलब्या..तेल्या विनाश इत्यादी बिनबुडाचे फवारणीचा वापर करतात. ***इथे तेल्या रोगामुळे झाड आधीच अशक्त...