डाळिंबातील फुलगळ- कारणे व उपाययोजना - श्री सुशांत सुर्वे



    डाळिंबातील फुलगळ- कारणे व उपाययोजना - श्री सुशांत सुर्वे 

मादी फुलांची जास्त प्रमाणात गळ होण्यास वातावरणातील बदल, काडीतील स्टोरेज या समस्या जास्त कारणीभूत ठरल्या. 
तसेच थ्रिप्स, बुरशीजन्य रोग, पाणी व्यवस्थापन, काडीतील स्टोरेज या गोष्टी देखील तितक्याच प्रमाणात कारणीभूत असतात. 
सध्या दिवसाचे तापमान जास्ती आणि रात्रीचे तापमान कमी अशी बऱ्याच ठिकाणी परिस्थिती आहे, त्यात मग झाडांवर जैविक अजैविक ताण इत्यादी गोष्टींतून फुलांची गळ होण्याची प्रमाण वाढले आहे. बऱ्याच वेळा पाऊस पडून गेला कि पाणी द्यावे कि देऊ नाही असा बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो आणि मग परत पाणी न दिल्याने गळ व पाऊस पडून  गेल्यावर देखील पावसाच्या आधी जितके पाणी चालू होते तेव्हडे पाणी दिल्याने बागेत अतिरिक्त ओलावा झाल्याने होणारी फुलगळ...अशा नानाविध कारणे फुलगळीस कारणीभूत आहेत. 
बागेतील प्रत्यक्ष भेटीतून नेमकी फुलगळ कशाने होते हे समजण्यास संधी मिळते तथापि वर दिलेली कारणे व त्या अनुषंगाने खाली काही उपाययोजना दिल्या आहेत, त्यानुसार बागेतील फुलगळ थांबण्यास/ कमी होण्यास आपणास मदत होईल. 
फुलगळ वरील मागील २ लेखांत त्याची कारणे उपाय या बदललं सविस्तर माहिती दिली आहे. तरीही परत एकदा थोडक्यात.. 
फुलगळ होऊ नये म्हणून,
- पाणी व्यवस्थापन नीट करा, पाऊस झाला/ वातावरण ढगाळ झाले कि पाणी काही प्रमाणात कमी करा. 
- फुलोऱ्यात देखील एखाद्या दोन चांगल्या बुरुशीनाशकयणची फवारणी घ्यावी. 
- रसशोषक किडींचा चांगला बंदोबस्त करावा. 
- मधमाशी चे बागेतील अस्तित्व तपासावे. 
- बागेला पांढरी मुळी चांगल्या प्रमाणात चालू आहे कि नाही याकडे लक्ष द्यावे. 
-बागेला खत व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करावे. 

फुलगळ चालू झाल्यास, 
- बागेचे पाणी काही प्रमाणात कमी करा. 
- प्लॅनोफीक्स ५०० मिली + १३/४०/१३- ४ किलो प्रति एकर प्रति आठवडा १-२ वेळा ड्रीपने सोडून द्या. 
- कॅल्शिअम नायट्रेट - ४किलो प्रति एकर एकदा बागेला सोडून द्या. 

- ड्रिपमधून *अनारकिंग नवसंजीवनी एकरी 5 लिटर दिलेले देखील मोठया प्रमाणात फायदेशीर राहील, नवीन फुल ..फुलगळ ..ग्रीनरी साठी त्याचा नक्कीच फायदा होईल. फळांच्या साईझ साठी देखील लक्षणीय फायदा होईल.*
(संपर्क : 8698652111)

- फवारणीमध्ये पहिली फवारणी प्लॅनोफीक्स - ४० मिली प्रति २०० लिटर + एखादे चांगले बुरषीनाषक घ्या. 
- दुसरी फवारणी बोरॉन १ ग्राम प्रति लिटर + चिलेटेड मायक्रोन्यूट्रिअन्ट घ्या. 
- वरील उपायांनी फुलगळ चांगल्या प्रकारे कंट्रोल झाली पाहिजे. 
वरील प्रत्येक एक ओळ आणि शब्द महत्वाचा आहे, त्यानुसार उपाययोजना करावी. बऱ्याच वेळा काही शेतकऱ्यांचे पाणी व स्प्रे व्यवस्थापन योग्य व वेळेवर असते तरीही फुलगळ होतेच याला वातावरणीय बदल व काडीतील स्टोरेज या दोन गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत राहतात. विश्रान्ती काळातील लेखातील वेळापत्रक वापरले तर काडीतील स्टोरेज वाढण्यास मदत होते व काडीत स्टोरेज जर चांगल्या प्रकारे असेल तर फुलगळ नक्कीच कमी होईल. कारण बऱ्याच वेळा बागेला भरपूर फुल निघते पण असे काही वातावरणीय बदल झाले कि ज्यांचे काडीतील स्टोरेज चांगले आहे अशा ठिकाणी झाडाखाली ५-६ फुले ड्रॉप होतील पण ज्या काडीत स्टोरेजच नाही तिथे १०-१५ फुले ड्रॉप झालेले मी बघितले आहे. त्यामुळे वरील सर्व उपाययोजना चांगल्या प्रकारे करा, बाग निश्चितच चांगला सेटिंग होईल. 
विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन कसे असावे याची सविस्तर माहिती मागील एका लेखात दिलेली आहे.
धन्यवाद. 
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
*जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर*
*फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.