आगामी 2 वर्षांतील डाळिंबाची परिस्थिती - श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन: 77 2009 2011)



आगामी 2 वर्षांतील डाळिंबाची परिस्थिती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

जितके डाळिंब क्षेत्र वाढते आहे..

तितकेच क्षेत्र कमी देखील होत आहे..याला खालील काही कारणे कारणीभूत आहेत.
- मररोगाचे वाढते प्रमाण
- तेल्या रोगाचा प्रादुर्भाव
- पाण्याची कमी उपलब्धता
- नवीन डाळिंब बागायतदारांना डाळिंब उत्पादित करताना येणाऱ्या अनंत अडचणी.
- बाजारभावाची अशाश्वतपणा त्यामुळे नगद पिके(ऊस इत्यादी) व इतर जोडधंदे/व्यवसाय (पॉलिहाऊस,दूधधंदा,शेळीपालन) इत्यादींकडे तरुण शेतकऱ्यांचा वाढलेला कल.

सध्या गुजरात राजस्थान इत्यादि अनेक भागांत तसेच महाराष्ट्राच्या देखील अनेक भागांत डाळिंब क्षेत्र प्रचंड वाढले आहे.
या वाढलेल्या क्षेत्रांमुळे यावर्षी बाजारभाव थोडे कमी राहिले पण इतकेही कमी पण नाही.
आता या सर्व भागांत एक गोष्ट सारखी आहे.
ती म्हणजे,
- नवीन जोमदार जमीन
- नवीन झाडे
- बहुदा न कसलेली जमीन
यामुळे होतंय असे कि..जुन्या डाळिंब बागांमध्ये ज्या समस्या जाणवत आहेत(तेल्यारोग/मररोग/निम्याटोड/फुले निघताना येणाऱ्या अडचणी-नरफूल/फुलगळ इत्यादी) तसेच रोगांचा प्रादुर्भाव इत्यादी या नवीन जमिनीत पहिल्या दुसऱ्या बहरात जाणवत नाही.
पण नंतर जशा जशा या समस्या जाणवू लागतील तसे तसे तेथील डाळिंब उत्पादन देखील कमी होत जाईल.

म्हणजे उत्पादन व मागणीचा मेळ साधत राहिला कि डाळींबाला बाजारभाव टिकून राहतील.

बरेच शेतकरी किंवा नव बागायतदार यांना ज्यांना डाळिंब बाग काढायची असते असे लोक सल्ला देतात...आता डाळिंबाचे काही खरे नाही राहिले..पहिल्यासारखे बाजारभाव आता भेटत नाही...आता आपण तर बाग काढूनच टाकलीय असा सल्ला देतात.
मी असे अनेक लोक बघतो कि जे म्हणतात कंटाळलो डाळिंबाला व आता बाग काढून टाकतो अशा बागेत त्यांनी 5-7 वर्ष उत्पादन घेतलेले असते व त्या बागेतील 50% हुन अधिक झाडे आता पिवळी पडून गेलेली असतात व ती बाग काढणेच योग्य असते. व परत ती बाग काढून मध्ये 1-2 पिके घेऊन परत डाळिंब लागवड करतात.

अशा वेळी *जो नवीन बागायतदार असतो त्याचा मनात हा विचार येतो कि डाळिंबातील एवढा जुना माणूस हा..हा डाळिंबाला कंटाळला..याने बाग काढली..मग आपण तर काहीच नाही व मग यांच्या डोक्यात बाग काढायचा विचार येतो..अहो पण त्यांच्या बागेत चांगली झाडेच नव्हती राहिली..त्यांनी 7-8 वर्ष लक्षावधी उत्पन्न घेतले त्या बागेतून..त्यांना बाग परत लावायचीय मग त्यांचे ऐकून तुम्ही आपली चांगली बाग का काढताय..??*

आपल्याला 2-3 बहार अडचणी येतील त्यातून शिकत चला..त्यात पैसे व वेळ गुंतवला आहे तर त्यातून काही उत्पन्न घ्या..कमी खर्चात चांगले प्रामाणिक मार्गदर्शन करणारे काही लोक बघा..तरच डाळिंबातील पैसे दिसतील..!!


*बाजारगप्पा ऐकून कधीच बाग काढायचा विचार करू नका ..जी बाग 2 वर्ष सांभाळली ती कुणाच्या 2 तासाच्या गप्पा ऐकून काढू नका..मी नेहमी सांगत असतो डाळिंबात अजूनही अनेक समस्या आहेत कि ज्यामुळे डाळिंबाला बाजारभाव किमान 30 रुपये किलो आहेत...ज्या दिवशी डाळिंबातील सर्व समस्यांवर उपाय सापडेल..त्यादिवशी डाळिंबाची अवस्था कांद्यासारखी होण्यास वेळ लागणार नाही*

त्यामुळे अनुभवातून शिकत चला..
*आगामी 2 नाहीतर आगामी 20 वर्ष देखील डाळिंबाचे भवितव्य उज्वल आहे* ...फक्त आपण कोणत्या मानसिकतेतून त्याकडे बघतो हे महत्वाचं आहे. जयकिसान कृषी समूह नेहमीच आपल्याला योग्य व प्रामाणिक मार्गदर्शन याकामी करत राहील.

निसर्गाचा लहरीपणा..अस्मानी संकटे कधी येतील याचा नियम नाही..त्यामुळे नवीन डाळिंब बागायतदारांना सांगणे आहे कि काही ठराविक एखाद्या एकर पासून डाळिंबशेतीला सुरुवात करा..व मग नंतर आपल्या अनुभवानुसार त्यात गुंतवणूक व क्षेत्र वाढवत चला.एकावेळी मोठी उडी मारू नका.
बाग लावताना किंवा बहार धरताना आपल्याकडील पाण्याची उपलब्धता बघत चला ..बाग मध्यावर आली व पाणी संपले असे केले तर पूर्णतः खर्च वाया जाईल.
डाळिंब बागेत योग्य त्या प्रमाणात गरजेनुसारच खर्च करा.
डाळिंब बागेचा विमा नेहमी काढून घेत चला.

*डाळिंबाने शेतकरी-डाळिंब मजूर-कृषी व्यावसायिक-पॅकिंग कामगार-डाळिंब व्यापारी-एकंदरीत सर्वांना मजबूत
केले..फक्त ज्यांनी प्रामाणिक पणे त्यात काम केले*

डाळिंबाचा हा सर्व लेखाजोखा तुमच्यासमोर मांडला आहे.
*चांगल्या प्रामाणिक प्रयत्नांतून डाळिंबशेती करा नक्कीच तुम्ही यशस्वी व्हाल.*
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे 
जयकिसान कृषी सेवा केंद्र 
चिखली संगमनेर अहमदनगर 
फोन/व्हाट्सअँप: 77-2009-2011

टिप्पण्या

  1. अतिशय योग्य सल्ला व मौलिक मार्गदर्शन केले सर

    उत्तर द्याहटवा
  2. छान माहिती सर
    उपयुक्त मार्गदर्शन

    उत्तर द्याहटवा
  3. योग्य मार्गदर्शन केले सर आपन नवीन बागायतदार साठी

    उत्तर द्याहटवा
  4. अप्रतिम माहिती दिलीत सरजी ...🌷⚘ आमच्या सारख्या नवतरूणांना अशीच माहिती मिळत रहावी..ही माफक अपेक्षा..🤘🙏🙏

    उत्तर द्याहटवा
  5. Nice sir........खुप छान सल्ला दिला आहे आपण। ,,,,,

    उत्तर द्याहटवा
  6. सरांची बातच वेगळी आहे शेतकरी हितार्थ

    उत्तर द्याहटवा
  7. चांगली व सध्याच्या परिस्थितीत अनुरूप माहिती आहे. धन्यवाद सर

    उत्तर द्याहटवा
  8. शेतकरी अर्धवट माहिती घेऊन घाबरतो आपल्या सारखे तज्ज्ञ योग्यवेळी योग्य मार्गदर्शन करतात ते घेऊन योग्य नियोजन करून बागा चांगल्या पद्धतीने सांभाळून योग्य प्रकारे उत्पादन घेता येते आज कांद्याला भाव आहे म्हणूनकांद्याची पुढें एवढी लागवड होईल की भाव पडतील लागवाड खर्च सुध्दा निघणार नाही डाळिंबाला रोग आहेत म्हणून भाव सुद्धा साधारण 30 ते 50 रुपये तरी भाव मिळतो नाहीतर डाळिंबात व कांद्यात काहीच फरक राहणार नाही त्यामुळे घाबरून ना जाता सुर्वे साहेबांचे योग्य मार्गदर्शन घेऊन बागा चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊत

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.