विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
विश्रांतीच्या काळात बागेची काय काळजी घेतली पाहिजे या विषयी बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारणा केली...लिखाण करून संपवावा असा हा विषय नाही..पण खाली काही फवारणी व आणखी काही नियोजन सांगितले आहे...ते नीट अवलंबले तर निश्चितच चांगली फळधारणा होण्यास काहीही अडचण येणार नाही...!!
*आधीच्या बहार मध्ये फळ निघून गेल्याने झाडांतील जवळपास सर्वच ताकत निघून गेलेली असते,परिणामी झाडाच्या काडीतील अन्नद्रव्ये स्टोरेज पूर्णतः संपलेले असते..अशा वेळी फळ निघून बाग ताणावर सोडायच्या आधी झाडाला NPK खतांची योग्य अशी मात्रा द्यावी..जेणेकरून झाडात परत ताकत निर्माण होईल..काही शेतकरी एकदा बागेतील फळ निघून गेले कि परत पुढची पानगळ करायच्या वेळीस बागेत येतात...मित्रहो असे ढिसाळ नियोजन चालत नाही. अगदी साध्या भाषेत सांगायचं ठरलं तर बाळंतीण बाई 9 महिने बाळ आपल्या पोटात वाढविते..त्याच्या पोषणावर तिची सर्व ताकत खर्च होते..व डिलिव्हरी झाली कि आपण तिला खारीक खोबरे..इतर पोषणहार खाऊ घालतो जेणेकरून तिची कमी झालेली ताकत पुन्हा भरून येईल...मित्रहो इथे डाळिंबाचे झाड म्हणजे बाळंतीण आणि डाळिंब म्हणजे तिने 7 महिने सांभाळले बाळ....सांगायचं मतितार्थ एवढाच कि झाडाने सुद्धा 7 महिने स्वतःची ताकत खर्च करून डाळिंब सांभाळले आहे..त्यामुळे डाळिंब उतरून गेल्यावर सुद्धा झाडांना पोषणहार दिला गेलाच पाहिजे.
पानगळीनंतर झाडांनी फुटवा जास्त प्रमाणात फेकणे..फुले न निघने...निघालेल्या फुलांची ड्रॉपिंग होणे..मादीफुल न निघता नर फुलंच जास्ती प्रमाणात निघणे..हि सगळी डाळिंबाच्या काडीत कमी स्टोरेज असण्याची लक्षणे आहेत..!!
1) त्यामुळे आधीचा बहार संपल्यानंतर किंवा नवीन बहार सुरु करायच्या आधी झाडाला कमीत कमी एकरी 2 बॅग 18/46/00 व 1 बॅग 10/26/26 तरी टाकावी.
2) विश्रांती काळात 00/52/34-5ग्रॅम प्रति लिटर अधिक 00/00/50-5ग्रॅम प्रति लिटर ची फवारणी महिन्यातून एक दोन वेळा करावी. फुटवा कमी धावावा तसेच काडीतील स्टोरेज साठी हि फवारणी उपयुक्त ठरते.
3) विश्रांती काळात एखादया दोन साधी बुरशीनाशके/बोर्डो तसेच कीटकनाशकांची फवारणी करावी.
4) नवीन बहार धरायच्या आधी शेणखत टाकलेले खड्डे उकरून घ्यावे व जुन्या मुळीचा जारवा तुटेल या मापात खड्डा करावा.
5) चांगले कुजलेले शेणखतच बागेला भरा. शेणखत भरायच्या आधी त्यावर ट्रायकोडर्मा इत्यादी बॅक्टरीया वाढवून असे खत बागेस भरावे.
6) विश्रांती काळात झाडावरची सर्व फुले फळे तोडून टाकावीत.
7) बहार सुरु करायच्या आधी झाडाच्या खोडांना घेरू पेस्ट चोळून द्यावी.
बाग लीक होऊन त्याला नवीन पालवी फुटायच्या आत छाटणी करून पानगळ मारून टाकावी.
9)चांगला फुलोरा निघणे व बागेचे पुढील नियोजन हे 80% छाटणीवर अवलंबून असते त्यामुळे छाटणीसाठी 2 रुपये जास्ती जाऊद्या पण छाटणी करणारे प्रशिक्षितच पहा...नाहीतर 2 रुपये झाडाने स्वस्त छाटणी घेणारे 2 मिनिटात जी काडी तयार होण्याला 2 वर्ष लागली अशी काडी छाटून टाकतात. त्यांच्या डोक्यात छाटनी कमी पण झाडाची छत्री कशी होईल एवढेच बघतात.
म्हणून ज्यांना छाटणीमध्ये कोणती काडी ठेवायचीय कोणती काढायचीय हे कळते अशेच छाटणीवाले बघा.
10) विश्रांती काळात फळ उतरून गेला कि लगेच झाडाचे पाणी तोडू नका. शेवटी जर चार तास पाणी चालत होते तर काही दिवस साडेतीन तास नंतर तीन तास नंतर दोन तास नंतर एक अर्धा असं करत पाणी तोडा. साधारण बागेला 45-60 दिवसाचा ताण दिला तर योग्य राहील.
11) पानगळ करायच्या एक महिना आधी खाली सांगितलेली फवारणी 5 दिवसांच्या अंतराने 3 वेळा मारा. अतिशय उत्कृष्ट असे रिजल्ट तुम्हाला कमी फुटवा,मादीफूलांची संख्या जास्त,कमी फुल ड्रॉपिंग, व फुलांचा स्ट्रोक चांगला या स्वरूपात जाणवतील.
गूळ - 5ग्रॅम/लिटर
DAP - 4ग्राम/लिटर
13/00/45- 3ग्राम/लिटर
कॅल्शिअम नायट्रेट- 2ग्राम/लिटर
सल्फर - 1ग्राम/लिटर
बोरॉन - 0.5ग्राम/लिटर
*वरील औषधे वरील प्रमाणातच वरील क्रमानेच टाकीत टाकावीत. प्रमाण व औषधांत तसेच टाकीत टाकण्याच्या कर्मात कुठलाही बदल करू नये . तयार झालेला साका 5 दिवसांच्या अंतराने 3 वेळा फवारणी घ्यावी व नंतर
पानगळ करावी.
वरील प्रमाण हे एकवेळच्याच फवारणीचे आहे. म्हणजे पुढील फवारणीच्या वेळी वरील औषधे वरील प्रमाणात टाकून नवीन साका तयार करावा.
तसेच वरील औषधांपैकी १८/४६ जेवढ्या प्रमाणात लागणार असेल तेवढेच फक्त आधीच्या दिवशी भिजत ठेवावे, बाकी औषधे फवारणीच्या वेळी त्या दिवशी टाकले तरी चालेल.
12) इथ्रेल ची योग्य प्रमाणात फवारणी करावी. ज्या बागांना पानगळ आधी जास्त ताण असेल त्यांनी पानगळ फवारणीच्या दिवशी बागेला 15-25 मिनिटे पाणी सोडावे.ज्या बाग पानगळ दिवशी देखील ४०-५०% पाने शिल्लक आहे त्यांनी पानगळ दिवशी पाणी देण्याचे गरज नाही.
विश्रांती काळात अनारकिंग नवसंजीवनीचा वापर केला तरी चालेल, त्याने विश्रांती काळात जे डोस टाकलेले आहे त्यांचे अपटेक होईल व काडीतील स्टोरेज वाढत जाईल. नियोजन असे असावे कि ज्यावेळी डोस टाकून, नवसंजीवनी देऊन खतांचे अपटेक वाढेल...व काडीतील स्टोरेज वाढून मग अतिरिक्त स्टोरेज फुटव्यांवाटे बाहेर पडेल त्यावेळी विश्रांती काळातील फवारणी चालू करून मग ते फुटवे वाढ थांबून मग काडीकडे स्टोरेज वळवले जावे.
त्याआधीच तुम्ही विश्रांती काळातील फवारणी चालू करू नये. बागेला/झाडांना बाग खाली झाल्यानंतर थोडा मोकळा वेळ द्यावा,त्यांना त्यांच्या कलाने थोडे वाढू द्यावे त्यांतील स्टोरेज वाढून द्यावे व मग नंतर फवारणी चालू करा म्हणजे स्टोरेज योग्य पद्धतीत वाढेल.
अनारकिंग नवसंजीवनी विश्रांती काळात देखील स्टोरेजसाठी चांगली मदत करेल, त्याची पूर्ण महाराष्ट्रात जयकिशन कृषी, चिखली संगमनेर मार्फत पाठवले जाते. अगदी कमी खर्चात चांगला रिझल्ट तुम्हाला अनारकिंग नवसंजीवनीचा वापर करून मिळेल. अधिक माहितीसाठी ८४८४८२५४११ इथे संपर्क करावा.
माझ्या अनुभव नुसार मी आपणास वरील नियोजन सांगितले आहे. त्यात काही शंका असल्यास संपर्क करावा.
धन्यवाद...!!
श्री. सुशांत हिरालाल सुर्वे
जयकिसान कृषी सेवा केंद्र
चिखली, संगमनेर, अहमदनगर
फोन/व्हाट्सअँप: ७७-२००९-२०११

Very good information sir
उत्तर द्याहटवाThanks
no.1 gide sir
उत्तर द्याहटवाNice sir
उत्तर द्याहटवाNice information sushant vadilana ekhi mahiti deto kharde sir
उत्तर द्याहटवाVery good information sir
उत्तर द्याहटवाSuper information sar thank you surve sar
उत्तर द्याहटवाचांगली माहिती आहे सर
उत्तर द्याहटवाThanks
उत्तर द्याहटवासखोल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर
उत्तर द्याहटवाNice sir
उत्तर द्याहटवाअभिनंदन सर
उत्तर द्याहटवाखूप छान सर
उत्तर द्याहटवा
उत्तर द्याहटवासखोल माहिती दिल्याबद्दल आभारी आहे.🙏
सगळी औषधे एकदम मागायची का
उत्तर द्याहटवाधंनवाद
उत्तर द्याहटवाछान माहिती दिली सर
उत्तर द्याहटवाNice information..
उत्तर द्याहटवाNice
उत्तर द्याहटवासर तुमच्या कडून डाळिंब पिकाची बरीच माहिती मिळते खूप छान वाटते सर,तरी आपण आपले शेडूल तयार करून पाठवले तर अजून खप छान होईल
उत्तर द्याहटवाछान माहिती दिली सर,आभारी आहे।.
उत्तर द्याहटवाखूप छान आहे सर
उत्तर द्याहटवाThank you sir
उत्तर द्याहटवा