डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे.


डाळिंब बाजारभाव- सद्यस्थिती - आगामी अंदाज - श्री सुशांत सुर्वे. 

डाळिंब बाजार सध्या काय चालू आहेत तसेच आगामी काही दिवसांत बाजारभाव काय राहतील याबद्दल विचारणा केली होती तर त्याबद्दल काही गोष्टी.
- डाळिंब बाजारभाव पूर्णतः खात्रीलायक कधी वाढतील कधी कमी होतील याबद्दल शाश्वत माहिती देता येत नाही.
- बाजारातील मागणी व पुरवठा नुसार बाजारभाव ठरत राहतात.
- सध्या डाळिंबाचे बाजारभाव गुणवत्ता साईझ नुसार 40-60 रुपये प्रति किलो बाजारभाव आहेत.
- राजस्थान व महाराष्ट्र मधून सध्या डाळिंबाचा पुरवठा चालू आहे. 
- सध्या उत्तरेकडे छटपूजा वैगरे चालू असल्याने मार्केटमध्ये डाळिंबाची विक्री तितपत नाही.
- तथापि या पूजा वैगरे उरकल्यानंतर आगामी 8-10 दिवसानंतर मार्केट चांगल्यापैकी वाढू शकतात 
- रेट वाढू शकण्याची शक्यता यामुळे आहे कि राजस्थान येथील डाळिंब पुरवठा बऱ्यापैकी कमी झाला आहे शिवाय मार्केट मध्ये आंब्याची आवक कमी आहे व रेटहि अधिक आहेत...शिवाय वातावरण देखील बऱ्यापैकी उष्ण झालेले आहे त्यामुळे डाळिंबाची मागणी वाढते आहे. 
- शेवटी मागणी व पुरवठा इत्यादींवर मार्केट अवलंबून असते..पण मागणी व पुरवठा कधी वाढेल याचा अंदाज आपल्यालाच घ्यावा लागतो.
- मागे होळी नंतर मार्केट चांगले वाढेल असे सांगितले होते त्यानुसार होळी नंतर डाळिंबाचे बाजारभाव चांगले वाढले होते...आता 8-10 दिवसांत मार्केट परत एकदा वाढू शकते असा अंदाज आहे.
(शेवटी अंदाज हे अनुभवपरत्वेच असतात..त्यामुळे सांगितलेले फिक्सच असेल असं नाही...हा वर्तवलेला अंदाजच आहे)


प्रत्येक बाजारसमिती, प्रत्येक व्यापारी आणि प्रत्येक तालुक्यावर बाजारभाव बदलत चालतात...!!!
नाशिक आज 3000/- मार्केट झाले म्हणजे सरसकट 150/- रुपये किलो च्या भावाची अफवा सगळीकडे होऊन जाते..
पण मग,
दोन नंबर आणि तीन नंबर किती गेला..?
जाळीमागे किती किलो कट केला..?
हमाली/गाडीभाडे काय लागले..?
मग सगळा खर्च वजा करून सरासरी किती रुपये किलो डाळिंब गेले हे काढले पाहिजे..!

तीच गोष्ट जागेवर माल खरेदीत आहे,
जागेवर एक शेतकऱ्याने 50 रुपये ने द्यायाचा आणि एकाने 70 रुपये ने द्यायचा..
पण मग ज्याने 50 रुपये ने घेतला त्याने 1 टन मालात 5-6 जाळी माल रिजेक्शन काढला आणि 
ज्याने 70 रुपये ने घेतला त्याने 1 टन मालात  25-30 जाळी माल रिजेक्शन काढला..!!

मग इथे आपला माल त्यांच्या पेक्षा 20 रुपये किलो ने ज्यादा विकला बर का असं म्हणण्यात काही मजा नाही..!!

त्यामुळे मार्केट असो कि जागेवर खरेदी आपल्याला सगळं वजा जाऊन अगदी जागेवर माल दिल्यावर देखील रिजेक्शन माल कितिने दिला व चांगला कितीने याची सर्वांची सरासरी काढून मगच दुसऱ्याला सांगत जावे..!!

बराच वेळा ज्यांचा माल काढणीस आहे ते दुसर्यांना ज्यांचे डाळिंब गेले आहेत त्यांना किंवा फेसबुक/व्हाट्सअँप वर आज किती भाव गेले डाळिंब विचारता अशा वेळी समोरच्यानि देखील सरासरी भाव सांगावा. 
नाहीतर कोण कुठला विडिओ/पट्टी येते कि डाळिंब 150/- रुपये किलो आणि आपण माल तोडून नेला कि आपल्याला खर्च जाऊन 50-60 रुपये च पडतो. त्यामुळे सर्व हिशोब करूनच माल मार्केट ला न्या किंवा जागेवर द्या..!!

ग्रुपवर बाजारभाव याच गोष्टीमुळे मी टाकत नाही.. कारण अशा एखादी पट्टी/व्हिडीओ पेक्षा आपण समक्ष जाऊन किंवा व्यवस्थित चौकशी करूनच आपणच आपल्याला किती भावात आपले डाळिंब द्याचे ते ठरवावे. मी नेहमी सांगतो 2 रुपये किलो कमी ने व्यवहार करा पण मग नंतर हे का नाही चालत, ते का बर बाहेर फेकले असं होऊ देऊ नका...!!
पीक व्यवस्थापन विषयी हा ग्रुप आहे म्हणून फक्त पीक पिकवण्यापुरता या ग्रुपचा उद्देश आहे, त्यामुळे कोणत्याही व्यापारी वैगरे ना सुद्धा मी ग्रुप वर जाहिरात करू देत नाही..!! माझ्या ग्रुपवर जाहिरात करून आपण त्या भरोसे आपला लाखो रुपयांचा माल त्यांना द्यावा असं होऊ नये म्हणून असल्या जाहिराती ग्रुप वर नको..!!

डाळिंब बाजार व्यवस्थापन हा विषय पण मला काही नवीन नाही..उत्पादित माल कुठे कसा विकावा ह्याही विषयी मी लवकरच माहिती देईल.. ग्रुपवर चर्चेचा हा विषय नाही पण लवकरच प्रत्यक्षात तुमची आमची भेट झाली कि हे विषय सविस्तर मांडता येतील, डाळिंब तोडणी उरकल्यामुळे जरी आता या वर्षी आपल्याला त्याचा फायदा झाला नाही तरी आगामी वर्षांत नक्कीच त्याचा आपणास फायदा होईल हे नक्की आहे.
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर
फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.