डाळिंब जयकिसान व्हाट्सअँप ग्रुपवरील प्रश्नोत्तरे - भाग ५


डाळिंब जयकिसान व्हाट्सअँप ग्रुपवरील प्रश्नोत्तरे - भाग ५ 


s5/प्रश्न: कमी पाण्यात डाळिंबाचे बहार नियोजन कसे असावे..?

उत्तर:
कमी पाण्यात नियोजन असे फिक्स सांगता येत नाही.
डाळिंबाला सुरवातीपासून शेवट्पर्यंत किमान  एक दिवसाआड एक दिवस 2 तास पाणी देणे आवश्यक आहे.
पाण्याची उपलब्धता कमी असेल तर:
- सेंद्रिय मल्चिंग
- ड्रीप इरिगेशन
- सेंद्रिय स्लरीचा वापर
इत्यादी पर्याय वापरता येतात.
तरीही,
पाण्याची उपलब्धता हि योग्य प्रमाणात असेल तरच बहार धरावा, तसेच पाऊस पाणी च्या भरवश्यावर न बसता शेवट्पर्यंत बागेला पाणी पुरेल इतपत पाण्याची साठवणूक(शेततळे/पाणीटाकी) असावी
कारण बहार धरल्यानंतर किंवा फळे काढायला काही अवधी असताना पाणी
कमी पडल्याचे नुकसान अधिकहोते.
यावर्षी,
पाणी कमी पडले आहे तर फळ लवकर लाल करण्यासाठी काय करावे असा प्रश्न बऱ्याच शेतकऱ्यांनी विचारला
असे फळे लवकर लाल करण्यासाठी काही उपाय नसतो. एखादी गोष्ट पूर्णत्वास तिच्या ठरलेल्या कालावधीतच जाते, त्यात आपण काही प्रयोग केले तर तिथे नुकसान अधिक होण्याची शक्यता असते.
त्यामुळे,
बागायत भागांत काही अडचण नाही पण कोरडवाहू भागात तसेच नवीन बाग लागवड करायची ज्यांची इच्छा असेल त्यांनी आपल्याकडे असलेली पाण्याची उपलब्धता बघावी किंवा पाण्याची उपलब्धता असताना पाण्याची योग्य ती साठवणूक व्यवस्था करून बागेचा बहार धरत चला
बागेला कमी पाण्याचे व्यवस्थापन बघत बघण्यापेक्षा पानगळ नंतर ते फळे निघेपर्यंत पाण्याची उपलब्धता करून घ्यावी व नंतर पानगळ चे नियोजन करावे.
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर
फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११




s5/प्रश्न: अमोनिअम मॉलबीडेट चे कार्य काय व ते कधी फवारावे ..??

उत्तर:
अमोनिअम मॉलबीडेट हे अगदी सूक्ष्म प्रमाणात लागणारे अन्नद्रव आहे.
झाडाची पाने गोळा होऊन पिवळी पडणे, जुन्या पानांवर पिवळेपणा जाणवणे इत्यादी अमोनिअम मॉलबीडेट कमतरतेची लक्षणे आहेत.
पिकाला नत्र उपलब्ध करून देण्याचे कार्य हे सूक्ष्म अन्नद्रव्य करते.
आपल्याकडे शक्यतो या सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता जाणवत नाही. अतिशय आम्लधर्मी जमिनीत/नायट्रोजनची कमतरता असलेल्या जमिनीत अमोनिअम मॉलबीडेट ची कमतरता जाणवते
आपल्याकडे अशा जमिनी फारश्या नाहीत त्यामुळे काळजी करण्याचे काही काम नाही.
- सूक्ष्म प्रमाणात लागणारा हा घटक सूक्ष्म प्रमाणात चिलेटेड मायक्रोन्यूट्रिअन्ट फवारणी मार्फत पिकाला उपलब्ध होतो, त्यामुळे त्याची विशेष अशी स्वतंत्र फवारणी घेण्याची गरज नसते.
- तथापि तज्ञ सल्ल्यानुसार प्रत्यक्ष पाहणीतून जर याची कमतरता जाणवत असेल तर अमोनिअम मॉलबीडेट ची स्वतंत्र फवारणी घेतली तरी चालेल..!
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर
फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११



s5/प्रश्न: बागेत बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोनती फवारनी करावी व ती किती दिवसांनी करावी - मार्गदर्शन करावे..?

उत्तर:
बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोणत्याही फवारणी फिक्स नाहीत. तसेच त्या किती दिवसांनी माराव्यात यात पण अनेकवेळा वातावरणानुसार बदल होत जातो.
बुरशीजन्य रोग कोणता आहे व त्याचा प्रसार कितपत आहे यावरून कोणते बुरशीनाशके मारावे लागतील ही ठरत असते.
त्यातही सुरुवातीस हलके बुरशीनाशके व नंतर स्ट्रॉंग  कधीकधी साधे व स्ट्रॉंग यांचे कॉम्बिनेशन घेणे गरजेचे असते.
मागील वेळी एका लेखात सांगितले तसे,
डाळिंब पिकात किंवा अन्य कोणत्याही पिकांत दिवसानुसार फिक्स असे फवारणी वेळापत्रक नाही, कारण वातावरणात कधी गारवा/कधी ढगाळ वातावरण/कधी पावसाळा/कधी दिवसा जास्ती तापमान व रात्री जास्ती थन्डी असे बदल अनेकदा होतात
- वातावरणात एकसारखेपणा नाही त्यामुळे फवारणीचे वेळापत्रक देता येत नाही
- दोन फवारणीमधील अंतर देखील वातावरणानुसार बदलते. म्हणजे,
- उन्हाळ्यात वातावरण साफ असले तर दोन फवारणींमध्ये ७-८ दिवसांचा गॅप चालतो.
- पावसाळ्यात पाऊस येऊन कडक ऊन पडले तर २-३ दिवसांचा गॅप ठेऊनच फवारा घ्यावा लागतो.
- थंडीत कधी अचानक जास्त प्रमाणात धुके आले तर लगेच फवारणी घ्यावी लागते.
- वरील सर्व गोष्टी विचारात घेऊन योग्य ती फवारणी..योग्य दिवसांच्या अंतराने घ्यावी लागते.
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर
फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११


s5/प्रश्न: मधमाशीला घातक नसलेली किटकनाशके कोणती!? जैविक कीटकनाशके ची काही नावे सांगावीत??

उत्तर:
केमिकल युक्त सर्वच कीटकनाशक मधमाशीला घातक असतात, त्यात कमी अधिक प्रमाणात तीव्रता वरून कमी-जास्त प्रमाणात मधमाशीला घातक असे केमिकल युक्त फवारणी ठरवता येईल.
आता सेटिंग च्या काळात मधमाशीला अपाय होऊ नये म्हणून जैविक कीटकनाशके चांगली
पण जैविक मध्ये खालील गोष्टी विचारात घ्याव्यात..
- मधमाशी टिकवायची असेल तर जैविक फवारणी आवश्यक पण फक्त आपण जैविक फवारणी घेणार आणि शेजारील बागेत केमिकल फवारणी चालणार तर अशाने मधमाशी बागेत येणार नाही
- अमेरिका सारख्या देशात जैविक शेती करताना त्यासमंधी माहिती शेताच्या बाजूला लावली जाते व आजूबाजूच्या सर्वांना केमिकल युक्त फवारणी घेण्यास प्रतिबंध किंवा काही शर्तींवर फवारणीस परवानगी दिली जाते, भारतात अजून तसे नाही...बऱ्याच वेळा मी पाहिलेय कि ज्यांच्या बागेवर तेल्या रोग आहे ते बाग लवकर काढत नाही किंवा तेल्या आला आहे काही उत्पन्न निघणार नाही म्हणून फवारणी घेणे सोडून देतात त्याचा परिणाम शेजारच्या बागांना होतो
- जैविक मध्ये कामगंध सापळे,किडी आकर्षित करणाऱ्या वनस्पती लागवड व जैविक औषधांची फवारणी या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात
- जैविक मध्ये केमिकल सारखी 100% कीड नाहीशी होत नाही..त्यात आपणास 2-5% नुकसान गृहीत धरून चालावे लागते
- रेसिड्यु फ्री बाग करणार्यांनी केमिकल युक्त जैविक औषधे वापरणे टाळावे
- मित्र किडी, मित्र बुरशी, मित्र जैविक कीटकनाशकांचा वापर केल्यास मधमाशीचे अस्तित्व जपता येईल
सध्या,
जैविक खते आणि औषधांच्या जवळपास हजारो कंपन्या सध्या मार्केट मध्ये आहे... त्यामुळे खात्रीशीर जैविक असे किती नावे आणि किती माहिती द्यायची हा प्रश्नच आहे..!!
- जयकिसान समूह तर्फे लवकरच खात्रीशीर जैविक औषधांची उपलब्धता करून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल
-जिल्हानिहाय माहिती संकलित झाली कि लवकरच जैविक मधील सर्व औषधांची माहिती व मार्गदर्शन आपणांस दिले जाईल.
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर
फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११


सुशांत हिरालाल सुर्वे.  जयकिसान कृषी सेवा केंद्र चिखली लिखित सर्व लेख, प्रश्नोत्तरे हे भारतीय कॉपीराईट ऑफिस,भारत सरकार अंतर्गत डायरी नंबर 14514/2018-CO/L,Literary/Dramatic या डायरीमध्ये कॉपीराईट संरक्षित आहे.  आम्ही लिहलेलं आर्टिकल, प्रश्नोत्तरे मालिका कॉपीराईट ऑफिस दिल्ली कडे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. तदापि,  जर कोणीही हे लेख वा ग्रुप मधील माहिती आपल्या नावाने प्रकाशित/प्रसारित करत असेल तर तो लेखनकाराच्या कार्याचा व साहित्याचा अवमान म्हणून कॉपीराईट ऍक्ट 1957 म्हणून गुन्ह्यास पात्र आहे.
त्याअनुषंगाने आपण सदरील लेख हे कुठेही आपल्या नावे प्रसारित करू नये. 

टिप्पण्या

  1. सर आपण शेतकर्यासाठी मोलाचे मार्गदर्शन करत आहात.

    उत्तर द्याहटवा
  2. सर तुम्ही खूप चांगले काम डाळिंब शेतकऱ्यांसाठी करतात असेच सहकार्य असू द्या

    उत्तर द्याहटवा
  3. सर आपल्या या ब्लॉगमुळे आमच्या सारख्या नविन बाग घालणाऱ्याना चांगलेच फायदेशीर आहे तुमच्या या कार्यास हार्दिक शुभेच्छा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.