जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची पद्धती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (77-2009-2011)



जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची पद्धती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (77-2009-2011)

s3/प्रश्न: जिवाणू स्लरी कशी बनवावी व PSB KSB जिवाणू कधी वापरावेत..?

उत्तर:
डाळींबातील मर रोग या लेखात आपण ट्रायकोडर्मा स्लरी कशी बनवायची ती पद्धत पहिली आहे. ती पद्धत खाली दिलेली आहे. प्रत्येक जिवाणू स्लरी बनविताना तीच पद्धत वापरावी फक्त आपणाला ज्या जिवाणूंची स्लरी बनवायची आहे तर ट्रायकोडर्मा ऐवजी ते जिवाणू वापरावे.
एक एकर साठी २०० लिटर पाणी चा एका टाकीमध्ये,
५ लिटर ट्रायकोडर्मा ५ लिटर ताक ५ किलो काळा गुळ ५ लिटर गोमूत्र
 या प्रमाणात घ्या. वरील मिश्रण एक २ दिवस भिजू द्या. प्रत्येक दिवशी टाकीत एक लाकडी काठी टाकून मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने  दिवसातून तीन वेळा मिश्रण हलवावे.
दुसऱ्या दिवशी या टाकीतील १८० लिटर पाणी ड्रीपवाटे बागेला सोडा व २० लिटर तसेच टाकीत ठेवा. या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी व गूळ गोमूत्र ताक वरील प्रमाणात परत टाका. ट्रायकोडर्मा परत टाकण्याची गरज नाही.
परत १८० लिटर ड्रिपवाटे सोडून द्या व २० लिटर परत बाकी ठेवा,या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी व गूळ गोमूत्र ताक वरील प्रमाणात परत टाका.व शेवटच्या वेळी पूर्ण २०० लिटर स्लरी सोडून द्या.


वरील मिश्रणात सर्व पदार्थ हे ड्रीप मधून जाणारे आहेत. जिवाणू घेताना पण लिक्विड मधील घ्या. पावडर फॉरमॅट मधील जिवाणू ड्रीप मधून जाणार नाहीत व फिल्टर चोकअप होण्याची शक्यता राहते. शिवाय स्लरी २-३ दिवसात २-३ वेळा सोडायची असले कारणाने शक्यतो ड्रीप वाटेच सोडा.


आता राहिला प्रश्न कोणते जिवाणू स्लरी कधी वापरावी.
साधारणतः मी ड्रीप ने कोणती खते कधी सोडावीत ते मागील लेखात सांगितले आहे. तर प्रत्येक खतात NPK चे प्रमाण वेगवेगळे राहते.
तर त्या साठी १२/६१/०० हि ग्रेड तुम्ही प्रत्येक आठवड्याला सोडत गेल्यानंतर ज्यावेळी तुमची २५ किलो ची गोणी संपेल किंवा ज्यावेळी तुम्ही पुढची खताची ग्रेड चालू कराल त्याच्या आधी PSB Phosphate solubilizing bacteria सोडा. म्हणजे १२/६१ ची गोणी संपली कि ४ दिवस गॅप देऊन स्लरी सोडण्यास सुरुवात करावी..२-३ दिवसात स्लरी देऊन झाली कि परत पुढील खताची ग्रेड चालू करावी. मधील गॅप यासाठी द्यायचा कि खताचा आणि जिवाणूंचा संपर्क येऊन जिवाणू स्लरी चा रिझल्ट कमी होऊ नये . psb ची स्लरी १२/६१ सोडून झाल्यानंतर दिल्यानंतर आतापर्यंत तुम्ही दिलेला १२/६१/०० मधील ६१% फॉस्फरस अपटेक होण्यास या स्लरी ने मदत होईल.
अशीच Potassium solubilizing bacteria (KSB) ची स्लरी जेव्हा तुम्ही बाग काढायला असेल व  ००/००/५० ची बॅग सोडून झाली असेल तद्नंतर करू शकता, जेणेकरून जमिनीतील सर्व पोटॅश शेवटच्या टप्प्यात फळांना पोहचून फळांना एकसारखा कलर येण्यास व चकाकी मदत होते...!!!
बाकी ट्रायकोडर्मा पॅसिलोमायसिस ची स्लरी जर मुलांवर गाठी दिसायला लागल्या तर कधीही करू शकता.
त्यामुळे १२/६१/०० सोडून झाल्यानंतर एकदा PSB स्लरी, १३/४०/१३ व ००/५२/३४ सोडून झाल्यानंतर पण PSB व ००/००/५० सोडून झाल्यानंतर KSB ची स्लरी द्यावी.

फक्त एक गोष्ट लक्षात असावी कि स्लरी जास्त दिवस ठेवली मग त्यातून आंबूस वास येऊ लागला कि बरेच लोक म्हणतात आमची स्लरी खूपच प्युअर झाली पण असं नाही..उलट जिवाणू २-३ दिवस पेक्षा जास्ती दिवस ठेवलेले कि तुम्ही त्यांना दिलेलं ताक गुल गोमूत्र आधी अन्न संपले कि ते एकमेकांना खाण्यास सुरुवात करतात परिणामी स्लरीचा रिझल्ट कमी होतो व स्लरीचा आंबूस वास सुटतो.. त्यामुळे वेळेत स्लरी सोडावी.
तसेच स्लरीचा टाकी उन्हात ठेवू नये .एखाद्या झाडाखाली टाकी ठेवून त्यावर सिंगल साडी चे झाकण टाकले तरी चालेल. हवेतील ऑक्सिजन टाकीत मिसळावा म्हणून टाकीचे झाकण उघडे ठेऊन साडीचे झाकण त्यावर ठेवा....!!!

"अनारकिंग नवसंजीवनी मध्ये बॅक्टरीया मल्टिप्लाय करून दिल्यास त्याचा रिझल्ट आणखी मोठ्या प्रमाणात भेटण्यास आपल्याला मदत होईल, कारण अनारकिंग नवसंजीवनी मध्ये देखील अनेक उपयुक्त बॅक्टरीया आहेत, आणि ज्यावेळी नवसंजीवनी सोबत कोणत्याही बॅक्टरीया मिक्स करून देता त्यावेळी त्यांचा काउंट झपाट्याने वाढण्यास मदत होते... त्यामुळे फळांची साईझ , काळोखी, पांढरी मुळी , मररोग व निम्याटोड कंट्रोल इत्यादींसाठी आपल्याला खूप उत्कृष्ट असा रिझल्ट मिळतो"

धन्यवाद...!!!
*श्री सुशांत हिरालाल सुर्वे.*
*जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर*
*फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

डाळिंबातील तेल्या रोग- कारणे व उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77 2009 2011)

विश्रांती काळातील डाळिंब बाग नियोजन- श्री सुशांत हिरालाल सुर्वे.