झिरो बजेट डाळिंब शेती: कल्पना-वास्तव-खरी संकल्पना - श्री सुशांत हिरालाल सुर्वे ( संपर्क: ७७-२००९-२०११)
झिरो बजेट डाळिंब शेती: कल्पना-वास्तव-खरी संकल्पना - श्री सुशांत हिरालाल सुर्वे ( संपर्क: ७७-२००९-२०११)
आजकाल हा मुद्दा मोठा कळीचा मुद्दा बनतोय...आता यात रासायनिक च्या बाजूने बोलावे कि झिरो बजट बद्दल बोलावे काही कळत नाही...मी तर यातील दोन्हींना महत्व देतो..कारण 100% यातील एकाच तंत्रावर शेती होऊ शकत नाही.Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.रासायनिक वर 100% शेती कराल तर खर्च अधिक व जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत जाईल
Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
झिरो बजेट वर शेती कराल तर ती ओसाड माळरानावर, निरोगी वातावरणात चांगली जमेल..पण मग आजूबाजूला शेकडो रोगग्रस्त बागा व मध्ये आपली झिरो बजेट शेती शक्य नाही..इथे तुम्हाला रासायनिक इतकी फळांची गुणवत्ता, तेवढी साईझ व तेवढे टनेज मिळणे अवघड आहे Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
झिरो बजेट कि रासायनिक याबद्दल माझा २००० सालच्या दरम्यानचा एक अनुभव सांगतो..
जवळे कडलग या आमच्या गावी भरपूर डाळिंब बाग आहेत.. त्यात एक नोकरदार व्यक्तींची बाग त्यांच्या बंधूंकडे सांभाळायला होती. आता या बागेत खर्च व उत्पन्न वरून नेहमी चर्चा व्हायची, आजही ती अनेक ठिकाणी मालक व वाटेकरी यांच्यात बाग निघून गेल्यावर होते तशीच...!Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
नोकरदार मालक लोकांना खर्च हा प्रमाणापेक्षा जास्त होतो व उत्पन्न तितपत मिळत नाही असे वाटते, बऱ्याच ठिकाणी ते सत्य पण आहे...!Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
त्यावेळी त्या नोकरदार व्यक्तीने एक वर्ष स्वतःच बाग करून बघू असं ठरविले..
त्यावेळी ना छाटणी केली ना बोर्डो फवारणी..Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. सुरुवात त्यांनी केली ती डायरेक्ट पानगळच्या इथ्रेल ने..नोकरदार व्यक्ती असल्याने पानगळ नंतर त्यांचे तितपत येणे व्हायचे नाही..त्यामुळे लवकर फवारणीचा काही समंध आलाच नाही...!!
फवारणी घायचे ते एखाद्या रविवारी..ती पण महिन्यातून एकदा...बाकी पाणी नियोजन जेमतेम घरातील व्यक्तींना वेळ भेटेल तसे..!!
आता या ठिकाणी आजूबाजूला देखील भरपूर डाळिंब बागा होत्या...ज्यावेळी इतर बागांच्या ४ फवारणी व्हायच्या त्यावेळी यांची एखादी फवारणी व्हायची.. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
तरीही झालं असं कि या व्यक्तीच्या बागेला इतर बागेंच्या तुलनेत सगळ्यात जास्त फळ सेटिंग झाले...चांगले निरोगी फळ निघाले...साईझ कमी पण फळाची गुणवत्ता व टनेज आजूबाजूच्या इतर बागांच्या तुलनेत जास्त निघाले. व मग साहजिकच दरवर्षी पेक्षा खर्च खूप कमी व बाजारभाव चांगले मिळाल्याने उत्पन्न व नफा खूप मिळाला. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
साहजिकच मी एवढी वर्ष शेती करत नव्हतो...स्वतः लक्ष देत नव्हतो म्हणून खर्च जादा होत होता व उत्पन्न कमी निघत होते, मी आता एका वर्षात एवढा नफा घेतला मग इथून मागे यांना देखील चांगलाच नफा झाला असेल असा यांचा समज झाला. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
यावेळी आजूबाजूला जेवढे डाळिंब बागायतदार होते त्यांना देखील प्रश्न पडला.. आम्ही एवढे बागेकडे लक्ष दिले... आमच्या ४ फवारणी व्हायच्या तेव्हा यांची एक फवारणी व्हायची मग तरीदेखील आमच्या बागेला सेटिंग कमी झाले.. फुलगळ अधिक झाली...खर्च अधिक झाला व उत्पन्न नफा तितपत भेटला नाही..! Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
हे सगळे प्रश्न डोक्यात घेऊन माझ्या वडिलांनी त्यावेळी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या शास्त्रज्ञांना त्यावेळी याबाबत विचारणा केली त्यावेळी मिळालेले उत्तर आज या झिरो बजेट विरुद्ध रासायनिक च्या वादात आपल्याला दिशा देईल.
त्यावेळी त्यांनी सांगितले कि ज्यावेळी तुम्ही आजूबाजूचे लोक रासायनिक च्या एकावर एक फवारणी घेत होते तेव्हा त्या भागातील, तुमच्या बागेतील सर्व मित्रकिडींनि या फवारणी नसलेल्या बागेत वास्तव्य केले..परिणामी या बागेत भरपूर मधमाशी...मावा थ्रिप्स यांना खाणारी मित्रकिडी..त्यामुळे फुलगळ कमी व सेटिंग चांगल्या प्रमाणात झाले..याउलट जिथे रासायनिक चा मारा जास्त होता तिथे मधमाशी व इतर मित्रकिडींचे वास्तव्य कमी त्यामुळे फुलगळ, थ्रिप्स कंट्रोल इत्यादीमुळे उत्पन्न तितपत निघाले नाही..त्या व्यक्तीच्या बागेत फवारणी कमी असल्याने किडींचा रेसिस्टन्स डेव्हलप झाला नाही म्हणून त्यांनी महिन्यातून एकदा जरी कमी तीव्रतेचे औषध जरी मारले तरी तिथे किडी लवकर कंट्रोल होत गेल्या...याउलट इकडे एक झाले कि एक अनेक स्ट्रॉंग फवारणी घेतल्याने मित्रकिडी तर गेल्याच शिवाय किडींची पुढील पिढीमध्ये रेसिस्टन्स डेव्हलप झाल्याने स्ट्रॉंग फवारणीने त्या गेल्या नाहीतⒸ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
आज जो वाद चालला आहे त्याला वरील . उदाहरणातून आपल्याला योग्य ते लक्षात येईल.
Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
आता त्या व्यक्तींनी केली तशी पूर्णतः झिरो बजेट शेती शक्य नाही, याला खालील कारणे आहेत.
- मित्रकिडींची तितपत संख्या मुळात आता राहिली नाही.
- मधमाशीचे अस्तिव संपुष्टात आले आहे.
- हानिकारक किडींची औषधे पचविण्याची शक्ती वाढत चालली आहे.
- चांगला बाजारभाव व उत्पन्न मिळावे यासाठी फळांना चांगली साईझ, चांगले टनेज मिळणे आवश्यक आहे जे रासायनिक शिवाय तितपत शक्य नाही. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
वरील कारणांमुळे मग १००% रासायनिक करायचे तर नाही, तुम्हांला रासायनिक कडून जैविक शेतीकडे जायचे असेल तर ते टप्य्याटप्याने जावे लागेल आज १००% रासायनिक चालू आहे व मग उद्यापासून सर्व रासायनिक बंद व सर्व झिरो बजेट चालू.. असे कराल तर १००% फसाल व आज झिरो बजेट करणाऱ्या अनेक लोकांचे तेच होत आहे..! रासायनिक सवय बागेला असल्यावर अचानक झिरो बजेट वर आल्याने तितपत गुणवत्तापूर्ण उत्पन्न न भेटल्याने अनेक लोक तोट्यात गेले व मग परत झिरो बजेट ला नाव ठेवण्यास सुरुवात झाली.
मग झिरो बजेट किंवा जैविक चालू करायचे कसे तर, Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
- जमिनीतून जैविक स्लरींचा वापर वाढवा.
- सेंद्रिय मल्चिंग चांगले कुजलेल्या शेणखतांचा वापर करा.
- जिवाणू स्लरी/ जिवाणू कीटकनाशकांचा वापर काही प्रमाणात चालू करा.
- मित्रकिडींचे अस्तिव टिकवण्यासाठी काही प्रमाणात फळाची गुणवत्ता जरी थोडी ढसाळली तरी अधून मधून जैविक कीटकनाशकांचा वापर करा. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
- जैविक औषधे वापरताना ते १००% जैविकच आहेत कि नाही हे बघा.
- हळू हळू या पद्धतीत उपाययोजना करून शेती काही प्रमाणात जैविक व काही प्रमाणात रासायनिक अशी चालू ठेवा.
- झिरो बजेट हि कोणी शोध लावलेली पद्धत नाही, हि पूर्वीपासूनच चालू आहे फक्त हळू हळू तिचे अस्तिव कमी होत गेले..निमऑइल, शेणखत, गांडूळखत किंवा जमिनीची उपयुक्तता वाढविणारे कोणतेही खत हे झिरो बजेटचाच एक भाग आहे. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
आज, यावरून अनेक वादविवाद चालू आहेत.. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
आपल्याला कोणाची बाजू घ्यायची नाही पण आपल्या जमिनीचे, आपले आरोग्य जपायचे असेल तर हळूहळू वरील उपायानुरूप शेती चालू करावी. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
आपल्या शेतीतील काही भाग या पद्धतीत शेती करून बघावी व मग टप्याटप्याने जैविक वापरत चालावे. १०० % रासायनिक शेतीला नाव ठेवणाऱ्यांकडे देखील आपण लक्ष देऊ नये किंवा जैविकशेतीला आधार नाही म्हणणाऱ्यांकडे देखील आपण लक्ष देऊ नये, आपणच आपल्या जमिनीचा पोत, सेंद्रिय कर्रब कसा वाढेल, आपल्या जमिनीचे आरोग्य कसे सुधारेल व आपला प्रति एकरी खर्च कसा कमी होईल याकडे लक्ष द्यावे.
Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे
जयकिसान कृषी समूह लवकरच आपल्याला या बाबतीत मार्गदर्शन करील, जैविक च्या मोठ्या बाजारपेठेत ज्या जैविक निविष्ठांचे १००% रिझल्ट असतील, निव्वळ फोटो व विडिओ च्या भरवश्यावर नाहीतर ज्यांचे रिझल्ट आम्ही समक्ष पाहिलेले असतील त्यांची माहिती आपल्या ग्रुपमार्फत दिली जाईल त्यासाठी आपणही ग्रुपमध्ये सहभागी व्हावे, डाळिंब मार्गदर्शनपर माहितीसाठी/ मदतीसाठी ग्रुप नेहमी चालू राहील
धन्यवाद.
श्री सुशांत हिरालाल सुर्वे.
जयकिसान कृषी सेवा केंद्र,चिखली,संगमनेर
फोन/व्हाट्सअँप : ७७-२००९-२०११
जयकिसान कृषी फेसबुक ग्रुपमध्ये जोडले जाण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा
https://www.facebook.com/groups/722697631401704/

Surve Sir,
उत्तर द्याहटवाI agree with your comments,