पोस्ट्स

कोरोना व ऑनलाईन फसवणूक : भाग 1 व भाग 2

ऑनलाईन फसवणूक समंधित खालील दिलेले दोन्ही भाग नीट  वाचा व जास्तीत जास्त शेअर करावेत.  कोरोना आणि ऑनलाईन फसवणूक-भाग १ मित्रांनो नमस्कार. शेती विषय सोडून आज थोडा वेगळा विषय  आहे पण संकटाच्या या कालावधीत याविषयी जागरूकता होणे आवश्यक आहे म्हणून लिहणे गरजेचे वाटत आहे.  कोरोना कालावधीत अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, काही ठिकाणी उद्योगधंदे ठप्प आहेत, काही लोकांना दोन वेळच्या जेवणाची तर काहींना भविष्यात काय लिहून ठेवले आहे याची भ्रांत आहे.  या सर्व अडीअडचणींना तोंड देत, कोरोनारूपी राक्षस पावलोपावली पाठलाग करत असताना देखील आपण पुन्हा अर्थव्यवस्थेला उभारी देण्यासाठी प्रयत्न करत आहोत.  या कालावधीत पैशांची बचत करून आपण आपले जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत. पण याच कालावधीत संधीचा फायदा घेऊन आपणाला लुबाडणारे देखील  वाढत आहेत..! आता मुख्य विषयाकडे जाऊयात.  मित्रांनो कोरोना कालावधी नंतर इंटरनेट चा वापर झपाट्याने वाढत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात इंटरनेट प्रभावीपणे वापरले जात आहे. कोरोना कालावधीत डिजिटल माध्यमांचा वापर करण्याचे प्रामण देखील चांगले...

अवकाळी पाऊस व डाळिंब बागेतील उपाययोजना- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन: ७७-२००९-२०११)

इमेज

डाळिंबातील पिवळा नायटा-उपाय- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77-2009-2011)

इमेज
डाळिंबातील पिवळा नायटा-उपाय- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे (फोन 77-2009-2011) आलेल्या डागांना पर्याय नाही...*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* जी फळे आहेत ती काढून घेऊन बागेतच न टाकता एका पॉलिथिन च्या पिशवीत बागेच्या बाहेर नेऊन जाळून टाकावीत. असा डाग वाढू नये किंवा पुढे येऊ नये म्हणून..*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* कॉपर 1.5 ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर त्यानंतर 5-7 दिवसांनी किटाझीन 1 मिली + एम45 - 2 ग्राम प्रति लिटर त्यानंतर 5-7 दिवसांनी *Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* कस्टोडिया आदामा 1.25 मिली /लिटर या फवारणी 5-7 दिवसाच्या अंतराने घ्याव्यात. आलेला डाग कव्हर होणार नाहीत पण आणखी डाग येऊ नयेत म्हणून फवारणी घ्यावी. महत्वाचे म्हणजे.*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे.* - *बाग सेटिंग झाली कि लगेच बेसल डोस टाकून द्यावा. डोस नसेल तर झाड अशक्त राहिल्याने देखील अनेक रोगराई बागेत येते.* - बागेत स्वच्छता चांगली ठेवावी.रोगात वातावरण बागेत असेल तर डाग वाढतात.*Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. - झाड जास्त गच्च नसावे. झाड गच्च असेल तर धुके दैवार पाऊस यांचे पाणी झाडावर साचून राहत...

डाळिंब बागेतील विद्राव्य खतांचे नियोजन- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे(77-2009-2011)

इमेज
डाळिंब बागेतील विद्राव्य खतांचे नियोजन- श्री. सुशांत हिरालाल सुर्वे(77-2009-2011) चांगल्या प्रकारे फळफुगवणीसाठी मी सांगितलेले खालील ड्रीपचे वेळापत्रक वापरावे. उत्तम सेटिंग नंतर  फळधारणा झाल्यानंतर लिक्विड ग्रेड कधी सोडाव्यात या विषयी आज माहिती देतो... कोणतेही फळ फुगवणीचे औषध सोडताना फळाची साल लूज आहे का बघा, नसेल तर आधी कॅल्शिअम बोरॉन वापरून साल लूज करावी हि फवारणी घ्यावी म्हणजे साल चांगली लूज होऊन फळ फुगवण होताना फळे तडकणार नाहीत. शिवाय स्टिम्यूलंट सोडल्यानंतर झाडाला ड्रिपवाटे चांगल्या प्रमाणात पाणी देण्यास विसरू नये * 12/61/00- या ग्रेड चा वापर साधारण फळ लिंबू आकारात असताना चालू करावा. फळ लिंबू आकार ते पेरू आकारात होईपर्यंत या ग्रेड चा वापर करावा. * 13/40/13- वरील ग्रेड सम्पल्यानन्तर म्हणजेच फळ साधारण पेरू आकाराचे झाल्यावर या ग्रेड चा वापर करावा. फळ पेरू आकार ते फळ काढणीला एखादा महिना बाकी असेपर्यंत हि ग्रेड द्यावि. * 00/52/34- फळ काढणीला एखादा महिना बाकी असताना हि ग्रेड चालू करावी. 34% पोटॅश असल्याने शेवटच्या स्टेज मध्ये दाण्यांमध्ये साखर उतरून ...

जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची पद्धती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (77-2009-2011)

इमेज
जिवाणू स्लरी तयार करण्याची व वापरण्याची पद्धती- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (77-2009-2011) s3/प्रश्न: जिवाणू स्लरी कशी बनवावी व PSB KSB जिवाणू कधी वापरावेत..? उत्तर: डाळींबातील मर रोग या लेखात आपण ट्रायकोडर्मा स्लरी कशी बनवायची ती पद्धत पहिली आहे. ती पद्धत खाली दिलेली आहे. प्रत्येक जिवाणू स्लरी बनविताना तीच पद्धत वापरावी फक्त आपणाला ज्या जिवाणूंची स्लरी बनवायची आहे तर ट्रायकोडर्मा ऐवजी ते जिवाणू वापरावे. एक एकर साठी २०० लिटर पाणी चा एका टाकीमध्ये, ५ लिटर ट्रायकोडर्मा ५ लिटर ताक ५ किलो काळा गुळ ५ लिटर गोमूत्र  या प्रमाणात घ्या. वरील मिश्रण एक २ दिवस भिजू द्या. प्रत्येक दिवशी टाकीत एक लाकडी काठी टाकून मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेने  दिवसातून तीन वेळा मिश्रण हलवावे. दुसऱ्या दिवशी या टाकीतील १८० लिटर पाणी ड्रीपवाटे बागेला सोडा व २० लिटर तसेच टाकीत ठेवा. या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी व गूळ गोमूत्र ताक वरील प्रमाणात परत टाका. ट्रायकोडर्मा परत टाकण्याची गरज नाही. परत १८० लिटर ड्रिपवाटे सोडून द्या व २० लिटर परत बाकी ठेवा,या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी ...

झिरो बजेट डाळिंब शेती: कल्पना-वास्तव-खरी संकल्पना - श्री सुशांत हिरालाल सुर्वे ( संपर्क: ७७-२००९-२०११)

इमेज
झिरो बजेट डाळिंब शेती: कल्पना-वास्तव-खरी संकल्पना - श्री सुशांत हिरालाल सुर्वे ( संपर्क: ७७-२००९-२०११ ) आजकाल हा मुद्दा मोठा कळीचा मुद्दा बनतोय...आता यात रासायनिक च्या बाजूने बोलावे कि झिरो बजट बद्दल बोलावे काही कळत नाही...मी तर यातील दोन्हींना महत्व देतो..कारण 100% यातील एकाच तंत्रावर शेती होऊ शकत नाही.Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. रासायनिक वर 100% शेती कराल तर खर्च अधिक व जमिनीचे आरोग्य दिवसेंदिवस खालावत जाईल Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. झिरो बजेट वर शेती कराल तर ती ओसाड माळरानावर, निरोगी वातावरणात चांगली जमेल..पण मग आजूबाजूला शेकडो रोगग्रस्त बागा व मध्ये आपली झिरो बजेट शेती शक्य नाही..इथे तुम्हाला रासायनिक इतकी फळांची गुणवत्ता, तेवढी साईझ व तेवढे टनेज मिळणे अवघड आहे Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. झिरो बजेट कि रासायनिक याबद्दल माझा २००० सालच्या दरम्यानचा एक अनुभव सांगतो.. जवळे कडलग या आमच्या गावी भरपूर डाळिंब बाग आहेत.. त्यात एक नोकरदार व्यक्तींची बाग त्यांच्या बंधूंकडे सांभाळायला होती. आता या बागेत खर्च व उत्पन्न वरून नेहमी चर्चा व्हायची, आजही ती अनेक ठिकाणी मालक व ...

तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करावयाच्या उपाययोजना- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (७७-२००९-२०११)

इमेज
तेल्याग्रस्त बागेत तात्काळ करावयाच्या उपाययोजना- श्री सुशांत हिरालाल सुर्वे (७७-२००९-२०११) तेल्या ग्रस्त बागेत डाळिंब तडकते असली तर  पहिली फवारणी:  कॉपर १.५ ग्राम + ब्रोमोपॉल अर्धा ग्राम प्रति लिटर घ्या. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. दुसरी फवारणी: कॅप्टाफ १.५ ग्राम + कॉन्टाफ १ मिली प्रति लिटर घ्या.  तसेच, Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. सुडोमोनास + बॅसिलस ची फवारणी देखील फायदेशीर राहील. हि फवारणी बनविण्याची पद्धत व तेल्या ग्रस्त बागेतील उपाययोजना यांची सविस्तर माहिती तेल्या रोगावरील माझ्या लेखात दिलेली आहे. आपण त्यानुसार उपाययोजना कराव्यात. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. वरील फवारणी करताना बागेला चांगल्या प्रमाणात ड्रीपने पाणी द्यावे व संध्याकाळच्या वेळेत शक्यतो फवारणी घ्यावि. पाणी देताना ते वाफसा स्थितीत द्यावे..पाटपाणी देणे टाळावे. Ⓒ श्री सुशांत हिरालाल सुर्वे. शिवाय, शेजारी तेल्याग्रस्त बाग असेल व त्यातही काही उपयुक्त फवारणी दोन्ही बागांत किंवा शेजारील तेल्याग्रस्त बागेत नसेल तर तेल्याचा प्रादुर्भाव वाढणे साहजिक आहे. आपल्या झाडाची ताकत माग...